‘जीवामृत’ खत बनवून नैसर्गिक बागायत केल्‍यावर चांगला परिणाम होत असल्‍याचे लक्षात येणे

१. ‘जीवामृत’ बनवणे

‘मी दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि संकेतस्‍थळांच्‍या माध्‍यमातून नैसर्गिक शेतीसंबंधी माहिती वाचली आणि त्‍यानुसार जीवामृत बनवले.

श्री. रवींद्र संसारे

२. जीवामृत वापरल्‍याने झाडांना फुले-फळे येणे

हे जीवामृत आमच्‍या बागेतील नारळ, सुपारी, आंबा, काजू, कोकम, रायआवळा आणि फुलझाडे यांना घातले. प्रत्‍येक मासातून २ वेळा असे ४ मास मी हे खत घातले. त्‍यानंतर आमची सुपारीची नवीन लागवड केलेल्‍या २२ झाडांमधील ८ झाडे चांगली झाली. रायआवळ्‍याला प्रथमच १० ते १५ आवळे लागले. कोकमाच्‍या झाडांना फळे आली. पिवळ्‍या सोनचाफ्‍याच्‍या झाडाला पुष्‍कळ फुले आली. नवीन लागवड केलेल्‍या एका नारळाच्‍या झाडाला पोय (नारळीच्‍या झाडाला आलेल्‍या फुलांवरचे आच्‍छादन) आली. अशा रितीने केवळ ४ मास जीवामृत घातल्‍याने झाडांमध्‍ये एवढा पालट झाल्‍याचे जाणवले.

३. ‘जीवामृत’ वापरल्‍याने आंब्‍याच्‍या झाडाला चांगली फळे येऊ शकतील !

याप्रमाणे आंब्‍याच्‍या झाडाला  जीवामृत घातल्‍यास त्‍यालाही फवारणी आणि रासायनिक खते न वापरता चांगली फळे येतील. अधिक उन्‍हामुळे आंब्‍याला आतून पांढरा साका (टीप) येतो, तोही जीवामृत वापरल्‍याने येणार नाही. ‘आंबा बागायतदारांनी हे वापरून पहावे’, असे मला वाटते.

टीप : आंब्‍याच्‍या बाठीजवळ थोडा भाग खराब होतो. तो साधारण कापसासारखा असतो.  त्‍याला कोकणात ‘गाईर’ असे म्‍हणतात.

४. कृतज्ञता

परम पूज्‍यांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) विषमुक्‍त शेती करण्‍यासाठी हा प्रयोग सांगितला आहे. तो मी स्‍वतः करून पाहिला. त्‍यांच्‍याच कृपेने मला त्‍यात यश आले. मी माझ्‍या शेजारी रहाणार्‍या तिघांना हा प्रयोग करून दाखवला. वरील सर्व कृती आणि त्‍यासंबंधी हे चार शब्‍द मला परम पूज्‍यांच्‍या कृपेमुळे लिहिता आले, त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

(२३.८.२०२२)

– श्री. रवींद्र सदाशिव संसारे (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे), गुहागर, श्रृंगारतळी, जिल्‍हा रत्नागिरी.