कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) ग्रामपंचायतीच्‍या भूमीवर लावलेले १४४ कलम रहित करा !

ग्रामस्‍थांचा हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा

हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा करत असलेले ग्रामस्‍थ

कोल्‍हापूर – ग्रामपंचायतीच्‍या नावे असलेल्‍या भूमीवर लावण्‍यात आलेले १४४ कलम रहित करावे, या मागणीसाठी कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील ग्रामस्‍थांनी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा झाल्‍यावर तहसीलदार कल्‍पना ढवळे यांना निवेदन देण्‍यात आले. तहसीलदारांनी कायदेशीर गोष्‍टींचा अभ्‍यास करून निर्णय देऊ, असे सांगितले. या मागणीसाठी गाव बंद आंदोलनास १०० टक्‍के प्रतिसाद देऊन ग्रामस्‍थांनी त्‍यांचा रोष व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकार्‍यांच्‍या नावे दिलेल्‍या निवेदनात म्‍हटले आहे की,

१. कुंभोज येथे समस्‍त मुसलमान समाजाच्‍या वतीने अध्‍यक्ष जामे मशीद कुंभोज यांनी सरपंच ग्रामपंचायत यांच्‍या विरोधात गट क्रमांक १९०३ विषयी वडगाव दिवाणी न्‍यायालय येथे दावा प्रविष्‍ट केला होता. हा दावा वर्ष २०१८ पासून चालू होता. या ठिकाणी प्रशासनाने १४४ कलम लावले आहे.

२. या दाव्‍यात यश मिळत नाही, हे लक्षात आल्‍यावर मुसलमान समाजाने हा दावा काढून घेण्‍यासाठी आवेदन प्रविष्‍ट केले आणि न्‍यायालयाने ते संमत केला.

३. त्‍यामुळे तहसीलदारांनी गट क्रमांक १९०३ विषयी लावलेले १४४ कलम रहित करण्‍यात यावे.

कुंभोज (जिल्‍हा कोल्‍हापूर) येथील मुसलमान समाजाकडून एका गटातील भूमी ही ग्रामपंचायतीची नसून त्‍यांची असल्‍याचा दावा केला जात आहे. वास्‍तविक हे क्षेत्र ग्रामपंचायतीच्‍या नावे असल्‍याने या क्षेत्रात आठवडी बाजार भरवण्‍यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न चालू आहेत. मुसलमान कब्रस्‍थानसाठी अन्‍य जागा उपलब्‍ध असूनही त्‍यांच्‍याकडून याच जागेची मागणी होत आहे. यामुळे तणाव निर्माण होत असल्‍याचा आरोप कुंभोज येथील ग्रामस्‍थांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

‘लँड जिहाद’च्‍या वाढत्‍या धोक्‍यासाठी हिंदूंनी सजग होणे अत्‍यावश्‍यक !