सातारा, २३ मार्च (वार्ता.) – येथील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत गुढीपाडव्याला श्रीरामनामाचा जयघोष करत ‘श्रीराम महायज्ञा’स प्रारंभ झाला. या महायज्ञात यांच्यासह २५ ब्रह्मवृंद सहभागी झाले आहेत, अशी माहिती वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांनी दिली.
वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले पुढे म्हणाले की, २६ वर्षांपासून ‘श्रीराम महायज्ञ’ चालू आहे. श्रीरामनवमीपर्यंत महायज्ञ चालणार असून प्रतिदिन सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत विविध देवतांच्या नावांचा मंत्रोच्चार करून यामध्ये आहुती देण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच कीर्तन, प्रवचन आणि भजन यांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. श्रीरामनवमीला दुपारी १२ वाजता जन्मकाळाचे कीर्तन होणार असून नंतर महाप्रसाद वितरीत करण्यात येणार आहे. यावर्षी काही कारणास्तव श्रीराम रथोत्सव होणारा नसून पुढील वर्षी मात्र श्रीराम महायज्ञाच्या सांगता सोहळ्यानिमित्त सातारा शहरातून श्रीराम रथयात्रा काढण्यात येईल.