जगात रेबिजमुळे मरणार्‍या एकूण संख्‍येच्‍या तब्‍बल ३६ टक्‍के लोक भारतात !

‘जागतिक आरोग्‍य संघटने’नुसार वर्ष २०२१ मध्‍ये भारतात ६ कोटी २० लाख भटकी कुत्री होती. त्‍यावर्षी ‘रेबिज’मुळे मृत्‍यूमुखी पडलेल्‍या भारतियांची संख्‍या २१ सहस्र २४० एवढी होती. ही संख्‍या जगातील रेबिजमुळे मरणार्‍या एकूण संख्‍येच्‍या तब्‍बल ३६ टक्‍के आहे. यातून भटक्‍या कुत्र्यांची विल्‍हेवाट लावण्‍याच्‍या सरकारी व्‍यवस्‍थेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित होते.’ (२.३.२०२३)