उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून राज्यांसाठी सूचना प्रसारित !

  • देशात प्रथमच प्रसारित झाल्या अशा प्रकारच्या सूचना !

  • उन्हाळ्यामुळे होणार्‍या आजारांवरील औषधांचा साठा करून ठेवण्याची रुग्णालयांना सूचना !

युनियन हेल्थ सेक्रेटरी राजेश भूषण

नवी देहली – केंद्रशासनाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सूचना प्रसारित केल्या आहेत. देशात प्रथमच आरोग्य मंत्रालयाकडून अशा प्रकारच्या सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी राज्यांच्या सर्व मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, देशातील काही ठिकाणचे तामपान वाढू लागले आहे. शासन ‘राष्ट्रीय वातावरण पालट अभियाना’च्या अंतर्गत या संदर्भातील माहिती गोळा करत आहे. त्यामुळे राज्यांनी ही माहिती आरोग्य मंत्रालयाकडे पाठवावी. १ मार्च २०२३ पासून उन्हाळ्यामुळे होणारे आजार, उष्माघात आदींमुळे होणार्‍या मृत्यूंची नोंद ठेवावी. रुग्णालयांनीही उन्हाळ्यामुळे होणार्‍या आजारांवरील औषधांचा साठा करून ठेवावा. सरकारांनी नागरिकांना उन्हाळ्याच्या संदर्भात सूचना द्याव्यात. यात दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर आवश्यकता असल्याच पडण्याविषयी सांगावे. यासह १०२ आणि १०८ हे दोन हेल्पलाईन क्रमांक प्रसारित करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जनतेला या क्रमांकावर संपर्क करून साहाय्य मागता येणार आहे.