साधक, तसेच वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना सेवेची सुसंधी !
‘सनातनचे विविध ठिकाणचे आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे अनेक वर्षांपासून साधक रहात असून तेथील गाद्या बर्याच काळापासून वापरात आहेत. या गाद्यांमधील कापूस पिंजून त्यापासून नवीन गादी बनवण्याची सेवा करायची आहे.
नवीन गादी बनवतांना गादीच्या आकारानुसार कापडाचे खोळ (कव्हर) शिवणे, यंत्राद्वारे कापूस पिंजून घेणे, कापडाच्या खोळीमध्ये कापूस भरून तो एकसमान रीतीने पसरणे आणि कापूस घट्ट रहावा, यासाठी कापडावर टाके घालणे, अशा प्रकारच्या सेवा कराव्या लागतात. या सर्व सेवांसाठी गादी बनवण्याचे कौशल्य असणार्यांची आवश्यकता आहे. साधक, वाचक, हितचिंतक किंवा धर्मप्रेमी यांच्यापैकी ज्यांना गादी बनवण्याचा अनुभव आहे किंवा ज्यांचा हा व्यवसाय आहे, अशा सर्वांना ही सेवेची सुवर्णसंधी आहे.
ज्यांचा गादी बनवण्याचा व्यवसाय आहे आणि ते किमान ८ – १० किंवा त्यापेक्षा अधिक दिवस सेवेसाठी देऊ शकतात अन् साधकांना प्रत्यक्ष गादी बनवायला शिकवू शकतात, अशा इच्छुकांनी संपर्क करावा. ज्यांना सेवेसाठी प्रत्यक्ष येणे शक्य होणार नाही; परंतु ते गादी बनवणे आणि साधकांना शिकवणे, या सेवांसाठी आपल्या कारखान्यातील कामगारांना पाठवू शकत असतील, त्यांनीही कृपया संपर्क करावा.
जे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी ‘सेवा’ म्हणून किंवा ‘सेवामूल्य (मजुरी)’ घेऊन वरील सेवांमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असतील, त्यांनी तसेही कळवावे. सेवा करण्यास इच्छुक असलेल्यांनी स्थानिक साधकांच्या माध्यमातून याविषयी जिल्हासेवकांना कळवावे. जिल्हासेवकांनी बाजूच्या सारणीनुसार माहिती पाठवावी.
नाव आणि संपर्क क्रमांक
सौ. भाग्यश्री सावंत (७०५८८८५६१०)
संगणकीय पत्ता : [email protected]
टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा – ४०३४०१.’
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था. (१५.२.२०२३)