टिपू सुलतानचे समर्थन करणार्‍यांना जिवंत रहाण्याचा अधिकार नाही !

भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांचे विधान !

भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील

बेंगळुरू (कर्नाटक) – आम्ही टिपू सुलतानचे वंशज नाही, तर आम्ही श्रीराम आणि श्री हनुमान यांचे भक्त आहोत. आम्ही टिपू सुलतानच्या वंशजांना राज्यातून बाहेर काढले आहे. जे लोक टिपू सुलतानचे समर्थन करतात, त्यांना जिवंत रहाण्याचा कोणताही अधिकार नाही. जे लोक भगवान श्रीराम आणि श्री हनुमान यांचे भक्त आहेत, तेच लोक कर्नाटकमध्ये रहातील, असे विधान भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी केले आहे. ते येलाबुरगा येथील भाजपच्या सभेत केले.

(म्हणे) ‘मी टिपू सुलतानचे नाव वारंवार घेईन !’ – असदुद्दीन ओवैसी

खासदार असदुद्दीन ओवैसी

ए.एन्.आय. वृत्तसंस्थेशी बोलतांना एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या वादावर म्हटले की, मी टिपू सुलतानचे नाव वारंवार घेईन, तुम्ही काय करता ते पहातोच. तसेच कर्नाटक प्रदेशाध्यक्षांच्या विधानाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहमत आहे का ? भाजप कटील यांच्यावर कारवाई करणार का ?, असे प्रश्‍न विचारत यांनी ‘कटील यांचे विधान हिंसा आणि नरसंहार घडवण्यसाठी प्रोत्साहन देणारे आहे’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

ज्या टिपूने एकाच दिवशी १ लाखाहून अधिक हिंदूंची हत्या आणि धर्मांतर केले, त्याचे नाव कोण आणि का घेत आहेत, हे हिंदूंना ठाऊक आहे ! अशांना फाळणीच्याच वेळी पाकिस्तानला पाठवणे योग्य ठरले असते; मात्र ‘आताही वेळ गेलेली नाही’, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

राजकीय नेत्यांकडून सोयीनुसार टिपू सुलतानच्या नावाचा वापर ! – टिपू  सुलतानचे वंशज

राजकीय नेते त्यांच्या सोयीप्रमाणे टिपू सुलतान यांचे नाव वापरतात. असे करण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही. यापुढे टिपू सुलतान यांच्या नावाचा अपवापर करण्यार्‍यांच्या विरोधात आम्ही हानीभरपाईचा खटला प्रविष्ट करून, अशी प्रतिक्रिया टिपू  सुलतान याचे वंशज मन्सूर अली यांनी दिली. (ओवैसी यांच्या विरोधात मन्सूर अली खटला प्रविष्ट करण्याचे धाडस दाखवतील का ? – संपादक)