भाजप सत्तेतून गेल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू ! – काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार

बेंगळुरू (कर्नाटक) – जेव्हा राज्यातील भाजपची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा आम्ही गोमूत्राने ते स्वच्छ करू आणि भगवान श्रीगणेशाची पूजा करू, असे विधान काँग्रेसचे नेते डी.के. शिवकुमार यांनी केले. ‘सध्याच्या सरकारचे केवळ ४० ते ४५ दिवस शेष आहेत. यामुळे त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यासाठी सामान बांधून सिद्ध राहिले पाहिजे’, असेही शिवकुमार म्हणाले.

संपादकीय भूमिका 

  • काँग्रेसने अनेक दशके केंद्रात आणि अनेक राज्यात सत्ता राबवली. तेथे काँग्रेसने काय केले, हे सर्वच जगाला ठाऊक आहे; मात्र याविषयी कधी कुणी अशी कृती केली नाही, हे लक्षात घ्या !
  • गोहत्या न रोखणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांना गोमूत्राचे महत्त्व लक्षात येते, हे आश्‍चर्यकारकच म्हणावे लागेल !