प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय ! – प्रफुल्ल टोंगे, हिंदु जनजागृती समिती

वर्धा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सौ. भार्गवी क्षीरसागर आणि श्री. प्रफुल्ल टोंगे

वर्धा, १५ जानेवारी (वार्ता.) – प्रेमाच्या आधारे विश्वासघात करून केलेले युद्ध, म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. हिंदु युवतींनी या युद्धाचा गांभीर्याने विचार करायला हवा. शस्त्रधारी शत्रू एकवेळ ओळखता येईल; पण असे प्रेमाच्या आडून विश्वासघात करणारे जिहादी ओळखणे कठीण आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रफुल्ल टोंगे यांनी १२ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सेलू येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केले.

मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी लढा उभारणे आवश्यक ! – सौ. भार्गवी क्षीरसागर, सनातन संस्था

आज हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्त झाली पाहिजेत. आपली ऐश्वर्यसंपन्न मंदिर संस्कृती संकटात आहे. सरकारीकरण झालेल्या मंदिरातील देवनिधीमध्ये अपहार केला जात आहे, त्यांची भूमी बळकावली जात आहेत. अनेक ठिकाणी मंदिरांतील प्राचीन परंपरा नष्ट केली जात आहे. यामुळे आपण आपल्या श्रद्धास्थानांचे रक्षण करण्याचा संकल्प केला पाहिजे. मंदिरांना सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी लढा उभारायला हवा.

क्षणचित्र : सभेनंतर वक्त्यांसह झालेल्या बैठकीमध्ये सेलू येथे प्रति शनिवारी श्री हनुमान चालिसाचे पठण आणि धर्मशिक्षण वर्ग यांचे आयोजन करण्याची मागणी धर्मप्रेमींनी केली, तसेच ‘हलाल जिहाद’ या विषयावर एक बैठक घ्यावी’, असेही सांगण्यात आले.