सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या घंटागाडी कर्मचार्यांना ठेकेदाराकडून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे सातारा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून घंटागाडी कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. २ मासांपासून घंटागाडी कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. ‘दुपारी १२ नंतर वेतन देतो’, असे ठेकेदाराने सांगितले. दुपारी १२ नंतरच काम करण्याचा निर्धार घंटागाडी कर्मचार्यांनी केला. यामुळे ठेकेदार आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. ठेकेदाराने कर्मचार्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यामुळे संतप्त कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन पुकारले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सातारा येथे घंटागाडी कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन !
सातारा येथे घंटागाडी कर्मचार्यांचे कामबंद आंदोलन !
नूतन लेख
संभाजीनगर येथे शाळेचे शुल्क ४० टक्के वाढवल्याने पालकांचे ठिय्या आंदोलन !
ग्रामदेवतेच्या मंदिराजवळील मद्यालयाला जिल्हाधिकार्यांनी अनुमती नाकारली !
नागपूर येथील ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा नोंद !
काळी-पिवळी जीप, टॅक्सीचे योग्यता प्रमाणपत्र २५ वर्षांपर्यंत वाढवून द्या ! – वाहतूक संघटना
सोलापूर, कोल्हापूर विद्यापिठाच्या २ फेब्रुवारीपासून होणार्या सर्व परीक्षा स्थगित
महाशिवरात्रीच्या निमित्ताने मिरज येथे कीर्तन महोत्सव, तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन ! – माधवराव गाडगीळ