व्यक्तीगत व्ययासाठी आर्थिक तरतुदीविषयीचा प्रेरक प्रसंग !

‘जगातील एक अतीधनाढ्य व्यक्ती रॉक फेलर यांची मुलगी एकदा लंडनला गेली होती. ती बाजारातून काही खरेदी करण्याचा विचार करत होती. ती एका चपलांच्या दुकानात गेली. चप्पल पाहिली; पण चप्पल तिला पुष्कळ महाग वाटली. ती दुकानदारास म्हणाली, ‘‘मी ही चप्पल खरेदी करू शकत नाही, ही महाग आहे.’’ दुकानदार म्हणाला, ‘‘आपण करोडपतीची मुलगी आहात, मग पैशाची गोष्टच कशाला ? रॉक फेलर संस्थान कोट्यवधी रुपयांचे दान करत असते. तुम्ही जे म्हणता ते आमच्या समजण्याच्या पलीकडचे आहे.’’ रॉक फेलरची मुलगी उत्तरादाखल म्हणाली, ‘‘मी एका करोडपतीची मुलगी आहे. व्यापार करण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतात; पण आमचे व्यक्तीगत व्ययाचे (खर्चाचे) बजेट (तरतूद) फारच अल्प आहे. आम्ही आमच्या व्यक्तीगत उपभोगासाठी अधिक व्यय करू शकत नाही.’’ (संदर्भ : अज्ञात)