नाताळच्या काळात हिंदूंच्या देवतांना सांताक्लॉजच्या स्वरूपात दाखवले, तर गुन्हा नोंदवू ! – बजरंग दलाची चेतावणी

नवी देहली – नाताळ या ख्रिस्त्यांच्या सणाच्या वेळी जर कुणी हिंदु देवतांना सांताक्लॉजच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न केला, तसेच देवतांची तशी वेशभूषा केली, तर अशांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम २९५ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येईल, अशी चेतावणी बजरंग दलाने दिली. गेल्या काही वर्षांपासून देशात देवतांना सांताक्लॉजच्या स्वरूपात दाखवण्याचे प्रकार घडले असल्याने त्या पार्श्‍वभूमीवर बजरंग दलाने ही चेतावणी दिली आहे.

 (सौजन्य : Amar Ujala Uttar Pradesh)

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते हिंदूंच्या देवतांचे विडंबन करतात. त्यामुळे आता हिंदूंच्या संघटनांनी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न केले पाहिजे !