जम्मूत मोठा शस्त्रसाठा हस्तगत

जम्मू – पोलिसांनी सांबा जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान अंतरराष्ट्रीय सीमेजवळील छन्नी मनासा या गावात मोठा शस्त्रसाठा २४ नोव्हेंबरला सकाळी हस्तगत केला. ही शस्त्रे ‘ड्रोन’च्या (मानवविरहित हवाई यंत्राच्या) माध्यमातून पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

याविषयी माहिती देतांना अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरिंदर चौधरी म्हणाले की, येथील एका शेतात बंद पाकीट पडले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ते पाकीट उघडले असता, त्यात २ पिस्तुले, ४ मॅगझीन, स्फोटके आणि ५ लाख रुपये रोख असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर परिसरात शोधमोहीम चालू करण्यात आली असून पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

जम्मू-काश्मीर आतंकवादमुक्त कधी होणार ?