आताच्या सरकारने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले, ही सरकारची कृती अभिनंदनीय आहे. हा आरंभ आहे, असे आम्ही मानतो. महाराष्ट्रातील किमान २० ते २२ महत्त्वाच्या गडदुर्गांवर अतिक्रमणे झाली असून यांविषयी वनविभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभाग या सर्वांना माहिती असून ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. वन आणि पुरातत्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदु संघटनांची मागणी आहे. प्रत्येक गडदुर्गाचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत.