हत्येनंतर आफताबने रात्रभर श्रद्धाच्या मृतदेहाशेजारी बसून गांजा ओढला !

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

गांजाच्या नशेत तिची हत्या केली – पोलिसांकडून खुलासे

नवी देहली – श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी अटकेत असलेला अफताब पुनावाला या नराधमाकडून पोलीस चौकशीत प्रतिदिन नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. देहली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबने १८ मे ला रात्री रात्री ९ ते १० वाजण्याच्या काळात श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्याने रात्रभर श्रद्धाच्या मृतदेहाच्या शेजारी बसून गांजा ओढला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब गांजाच्या नशेत असतांनाच श्रद्धाची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. या वेळी त्याने सांगितले की, गांजाच्या व्यसनावरून श्रद्धा त्याला नेहमी ओरडायची. हत्येच्या दिवशी दोघांमध्ये घरखर्च, तसेच मुंबईतून देहलीत सामान घेऊन कोण येणार ?, या सूत्रांवरून दिवसभर भांडण चालू होते. या भांडणानंतर आफताब घराबाहेर गेला आणि गांजा ओढून घरी परतला. तेव्हा श्रद्धाची हत्या करण्याचा कोणताही विचार नव्हता; पण गांजाच्या नशेत तिची हत्या केली. आफताबने प्रसाधनगृहाच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले. रक्त वाहून जावे, यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करतांना नळ चालू ठेवला होता. पाण्याचे देयक अधिक आल्याने पोलिसांना संशय आला आहे. आता हेच देयक या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. यासह ‘फॉरेन्सिक’ तज्ञांना स्वयंपाकघरात रक्ताचे डाग आढळले आहेत. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने ३०० लीटरचे शीतकपाट (फ्रीज) खरेदी केले. नंतर प्रतिदिन रात्री घराबाहेर पडून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेहाचे तुकडे फेकून देत त्याची विल्हेवाट लावली.

 (सौजन्य :News24)

आफताब श्रद्धाला देत होता पेटत्या सिगारेटचे चटके ! – श्रद्धाच्या मित्राची माहिती

श्रद्धा वालकर हिचा मित्र रजत शुक्ला याने प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले की, आफताब हा सैतान आहे. आफताब आणि श्रद्धा मुंबईत रहात असतांनाही आफताब तिला माहारण करत होता, तसेच तिला पेटत्या सिगारेटचे चटके देत होता. या चटक्यांचे डाग श्रद्धाने तिच्या मित्रांना दाखवले होते. त्या वेळी तिच्या मित्रांना आफताबविरुद्ध पोलीस तक्रार करायची होती; परंतु श्रद्धाला आफताबला सुधारण्याची संधी द्यायची होती.

संपादकीय भूमिका

  • माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा नराधमांना सरकारने पोसत बसण्यापेक्षा त्याला तात्काळ फासावर लटकवण्यासाठी प्रयत्न करावेत !
  • क्रूरकर्मा आफताबच्या अमानवी कुकृत्यांविषयी मुसलमान, त्यांच्या संघटना, त्यांचे पक्ष, तसेच त्यांचे ओवैसी, अबू आझमी यांसारखे नेते एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !