महापालिकेकडून ११० भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई !
नागपूर – भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणार्यांना, तसेच घाण करणार्या पाळीव कुत्र्यांच्या मालकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने आता शहरातील मोकळ्या भूखंडांवर साचलेला कचरा उचलण्याचा व्यय संबंधित भूखंड मालकांकडून वसूल केला जाणार आहे. याविषयी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ११० भूखंड मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.