१. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पहातांना ‘ते हसत आहेत’, असे जाणवून पुष्कळ आनंद होणे : ‘आश्रमातील स्वागतकक्षात सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे मोठे छायाचित्र आहे. या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘प.पू. भक्तराज महाराज माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे जाणवून मला पुष्कळ आनंद झाला.
२. श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेत असतांना चित्रातील चैतन्य अनुभवता येऊन निर्विचार स्थिती अनुभवणे : श्रीकृष्णाच्या चित्राचे दर्शन घेत असतांना ‘श्रीकृष्णाच्या डोळ्यांची उघडझाप होत आहे’, असे मला जाणवले. दुसर्या दिवशी मी श्रीकृष्णाच्या चित्राखाली लिहिलेले ‘श्रीकृष्ण की इस प्रतिमा का जितने भक्तिभाव से दर्शन करेंगे, उतनी ही उनके चैतन्य की अनुभूति होगी !’, हे वाक्य वाचले. त्या वेळी मला ते चैतन्य अनुभवता आल्याचे लक्षात येऊन माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. त्यानंतर मला पुष्कळ शांत वाटले आणि मी निर्विचार स्थिती अनुभवली.’
– सौ. उषा कांबळे, अमरावती (३०.९.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |