‘इन्फोसिस’च्या अध्यक्षा सुधा मूर्ती आणि पू. भिडेगुरुजी यांची भेट !

पू. भिडेगुरुजी यांच्याशी चर्चा करतांना सुधा मूर्ती

सांगली – ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा, तसेच प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सदिच्छा भेट घेतली. त्या सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता भावे नाट्यमंदिर येथे ही भेट झाली.

या वेळी सुधा मूर्ती यांनी पू. भिडेगुरुजी यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांची आपुलकीने चौकशी केली. पू. भिडेगुरुजी यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सुधा मूर्ती यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.