राज्यात उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये दुपटीने वाढ !

मुंबई – उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारकडून दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीमध्ये भाजप-शिवसेना सरकारकडून दुपटीने वाढ करण्यात आली आहे. २५ सहस्र रुपये असलेली शिष्यवृत्तीची रक्कम ५० सहस्र रुपये इतकी करण्यात आली आहे. २७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वर्ष २०११ मध्ये आघाडी सरकारच्या काळात ही शिष्यवृत्तीची रक्कम २५ सहस्र रुपये इतकी होती. वर्ष २०१८ मध्ये शिष्यवृत्तीसाठी पालकांच्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा २ लाख रुपयांवरून ८ लाख रुपये म्हणजे चौपटीपर्यंत वाढवण्यात आली होती. बारावीपर्यंत कला, वाणिज्य आणि विज्ञान या बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क यांची एकत्रित रक्कम किंवा ५० सहस्र रुपये यांपैकी जी रक्कम अल्प असेल, ती शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

  • बहुसंख्यांकांपेक्षा अल्पसंख्यांकांना भरमसाठ सवलती असलेला एकमेव देश !
  • अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जातात; परंतु प्रत्यक्षात किती अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहाशी म्हणजे देशाशी एकरूप व्हायचे आहे ?, हा खरा प्रश्न आहे !