केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे पुष्कळ पुरावे मिळाल्याने ‘पी.एफ्.आय.’वर कारवाई केली ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

देवेंद्र फडणवीस

नागपूर – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेवर कारवाई झाली, याचा अर्थ पुष्कळ प्रमाणात पुरावे हे ए.टी.एस्, एन्.आय.ए, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे उपलब्ध आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ सप्टेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. केरळ सरकारनेही ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. यातून अनेक गोष्टी समोर येतील. देशात अस्वस्थता निर्माण करण्याची ‘पी.एफ्.आय.’च्या ‘मोडस ऑपरेंडी’ संदर्भातील षड्यंत्र उघड होतील, असेही त्यांनी सांगितले.