उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात चकमक

गौतम बुद्ध नगर – उत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर जिल्ह्यात पोलीस आणि गोतस्कर यांच्यात १८ सप्टेंबरच्या रात्री चकमक झाली. या चकमकीत गोतस्कर ताजू याच्या पायाला गोळी लागली आणि तो घायाळ झाला. पोलिसांनी ताजू याला कह्यात घेतले. पोलिसांनी ताजू याच्यावर २५ सहस्र रुपयांचे बक्षीसही घोषित केले होते. ताजूच्या दोन्ही साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

१. ग्रेटर नोएडाचे पोलीस उपायुक्त विशाल पांडे यांनी सांगितले की, ४ गोतस्करांनी एका गायीची कत्तल करण्याचा कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना रोखण्यासाठी पोलीस दल तेथे पोचले.

२. या वेळी पोलीस आणि गोतस्कर यांच्यात चकमक उडाली. पोलिसांनी ताजू याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, तेव्हा त्याने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला.

३. ताजूला पायात गोळी लागली आणि तो घायाळ झाला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू आहे. (गोहत्येच्या विरोधात सतर्क राहून कारवाई करणार्‍या नोयडा पोलिसांचे अभिनंदन ! – संपादक)