तत्कालीन काँग्रेस सरकारने १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला दान केल्या !

वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेले पाप !

नवी देहली – वर्ष २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने राजधानीतील १२३ प्रमुख मालमत्ता देहली वक्फ बोर्डाला भेट म्हणून दिल्या. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार वर्ष २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस आधी मंत्रीमंडळाने हा निर्णय घेतला होता. या मालमत्ता कॅनॉट प्लेस, अशोक रोड, मथुरा रोड आणि इतर प्रमुख ठिकाणी आहेत.

अ. सरकारच्या निर्णयानंतर अतिरिक्त सचिव जे.पी. प्रकाश यांच्या स्वाक्षरीने एक पत्र पाठवण्यात आले.

आ. या पत्रामध्ये ‘भूमी आणि विकास कार्यालय (एल्.एन्.डी.ओ.) आणि देहली विकास प्राधिकरण (डीडीए) यांच्या नियंत्रणाखालील देहलीतील १२३ मालमत्ता देहली वक्फ बोर्डाकडे सुपुर्द करण्याची अनुमती देण्यात आली आहे’, असे लिहिले होते. (भाजप सरकारने ही सरकारी मालमत्ता जप्त करावी, अशीचच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे! – संपादक)  

इ. २७ फेब्रुवारी २०१४ या दिवशी देहली वक्फ बोर्डाने भारत सरकारला एक पत्र लिहून राजधानीतील १२३ प्रमुख मालमत्तावर दावा केला होता. विशेष म्हणजे हा प्रस्ताव मिळाल्यानंतर मंत्रीमंडळाने लगेच एक गुप्त पत्र पाठवून त्याला अनुमती दिली होती.

या मालमत्ता ब्रिटीश सरकारकडून भारत सरकारला वारशाने मिळाल्या होत्या.

संपादकीय भूमिका

  • स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे ती वक्फ बोर्डाला वाटणारे तत्कालीन काँग्रेस सरकार ! या निर्णयामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !
  • मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी जनताद्रोही निर्णय घेणारी काँग्रेस कधीतरी जनहित साधू शकणार का ?