बांगलादेशात श्री दुर्गादेवीच्या आणखी एका मूर्तीची तोडफोड

बांगलादेशात हिंदूंची मंदिरे आणि देवता असुरक्षित !

ढाका – बांगलादेशातील बरिशाल जिल्ह्यामधील महेंदगंज येथील  काशीपूर मंदिरावर आक्रमण करून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली.

सत्ताधारी अवामी लीगच्या जिहादी कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. हल्लीच अवामी लीगने या भागातील हिंदु खासदार पंकज नाथ यांना निलंबित केले होते.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक