रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

१. आश्रमात आल्यावर अनुभवलेली सात्त्विकता मी इतर कोणत्याही ठिकाणी अनुभवलेली नाही !

‘मी असा आश्रम पूर्वी कुठेही पाहिला नाही. आश्रमात आल्यावर मी जी सात्त्विकता अनुभवली, ती दुसर्‍या कोणत्याही ठिकाणी अनुभवली नसेल. आम्ही जसजसे आश्रमात फिरू लागलो, तसतशी माझ्या मनाची स्थिती पालटत गेली आणि ‘माझा भाव जागृत झाला.’

– श्री. जितेंद्र प्रकाश मोरे, अध्यक्ष, शिव आरती संघटन, नांदुरा, जिल्हा बुलढाणा. (१३.६.२०२२)

२. आश्रमात आल्यावर ‘मी माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले !

‘आश्रमाचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे’, असे मला वाटते. आश्रम पहातांना ‘या आश्रमाशी माझा जुना संबंध आहे’, असे मला वाटत होते. ‘मी माझ्या माहेरी आलो आहे, माझ्या मूळ स्थानी आलो आहे’, असे मला वाटले.’

– श्री. मदन पांडुरंगजी तिरमारे, प्रचारक, श्री गजानन महाराज सेवा समिती, अमरावती, महाराष्ट्र. (१३.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक