अमेठी (उत्तरप्रदेश) येथे अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी गायरान भूमीवर बांधण्यात आलेला अवैध मदरसा प्रशासनाकडून पाडण्यात आला. याला हसन नावाची व्यक्ती संचालित करत होती. त्याला हा मदरसा स्वतःहून पाडण्याची नोटीस बजावण्यात आली होती; मात्र त्याने न पाडल्याने प्रशासनाने तो पाडला. तसेच त्याला २ लाख २४ सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. वर्ष १९९७ मध्ये तो बांधण्यात आला होता. हसन याचे म्हणणे होते की, ग्रामसभेने मदरसा बांधण्याचा प्रस्ताव संमत केला होता आणि गावकर्‍यांनी दिलेल्या देगणीतून तो बांधण्यात आला होता. येथे १५० मुले शिकत होती.

संपादकीय भूमिका 

अवैध बांधकाम होईपर्यंत भारतातील प्रशासन नेहमीच झोपलेले असते !