हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांना संरक्षण पुरवण्यासाठी वाराणसी येथे निवेदन

वाराणसी (उत्तरप्रदेश) – एका पंथाच्या श्रद्धास्थानाचा अवमान केल्याच्या कथित आरोपावरून गोशामहल (तेलंगाणा) विधानसभा मतदारसंघाचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार श्री. टी. राजासिंह यांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अशी कलमे लावण्यात आले आहेत की, ज्यामुळे त्यांना किमान १ वर्षतरी कारागृहात रहावे लागेल. या माध्यमातून त्यांच्या विरोधात मोठे षड्यंत्र रचण्यात आले आहे. धर्मांध मुसलमानांकडून त्यांना ठार मारण्याच्या धमक्याही देण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसीचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून तेलंगाणाच्या मा. राज्यपालांना करण्यात आली. या वेळी वाराणसीचे शहर दंडाधिकारी सुरेंद्र बहादुर सिंह यांनी ‘योग्य कारवाईसाठी संबंधित निवेदन पुढे पाठवण्यात येईल’, असे सांगितले.