‘श्री दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या व्याख्यानाचे आयोजन !

साखरवाडी (तालुका फलटण), ८ सप्टेंबर (वार्ता.) – येथील ‘दत्त इंडिया कंपनी गणपती मंडप’ येथे हिंदु जनजागृती समितीला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी उपस्थितांना ‘श्री गणेशोत्सव शास्त्रानुसार कसा साजरा करावा ?, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ याविषयी संबोधित केले. या वेळी व्यासपिठावर सर्वश्री शिंदे, तुकाराम पवार, विकास तांबे उपस्थित होते. या कार्यक्रमाला ७० हून अधिक गणेशभक्त उपस्थित होते. या वेळी श्री. विकास तांबे यांनी प्रस्तावना केली आणि आभार मानले.

श्री. विक्रम घोडके

विशेष – व्याख्यानानंतर धर्मप्रेमींची बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये अनेक धर्मप्रेमींनी ‘हलाल जिहाद’विषयी जागृती करतो, ‘आमच्या गावात व्याख्यानाचे आयोजन करतो’, असे सांगितले, तर काहींनी हिंदूसंघटन करण्याचा निर्धार व्यक्त केला.