गणेशोत्सवाच्या काळात राष्ट्ररक्षण, धर्मजागृती आणि अध्यात्मप्रसार यांच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करा !

साधकांसाठी सूचना

‘३१.८.२०२२ ते ९.९.२०२२ या कालावधीत गणेशोत्सव असून अनेक गणेशमंडळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुखांना भेटून भाविकांसाठी साधना, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या प्रवचनांचे आयोजन करावे. मंडळांमध्ये सनातनने प्रकाशित केलेले विविध विषयांवरील ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावावे. धर्मशिक्षण देणारे, तसेच राष्ट्ररक्षणाविषयी अवगत करणारे फलकही मंडळांमध्ये लावता येतील.’