अमेरिकेत पोलिसांच्या तुटवड्याने गुन्ह्यांमध्ये वाढ !

अमेरिकेतील पोलीस

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील पोलीस विभागात कर्मचार्‍यांचा तुटवडा दिसून येतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत पोलिसांची स्वेच्छा निवृत्ती आणि सेवानिवृत्तीत ५० टक्के, तर त्यागपत्रात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनानंतर सहस्रो पोलिसांनी त्यागपत्रे दिली. अल्प वेतनामुळे पोलीस नोकरी करू इच्छित नाहीत. पोलिसांच्या संख्येत घट होत आहे. त्यामुळे गुन्ह्यांत वाढ होत आहे. अमेरिकेतील पोलीस विभाग लोकांची भरती करण्यासाठी खासगी आस्थापनांना प्रस्ताव देत आहे. अनेक विभागांनी तर लोकांना २ वर्षांसाठी नोकरीही दिली आहे. नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना बोनसही देऊ करण्यात आला आहे.