‘एफ्.बी.आय.’ने माझी ३ पारपत्रे चोरली ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘मार-ए-लागो’ या ‘रिसॉर्ट’वरील धाडीच्या वेळी ‘फेडरेशन ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (‘एफ्.बी.आय.’ने) माझी ३ पारपत्रे चोरली. त्यांपैकी एकाची मुदत संपली होती. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करण्याचा हा सर्वांत वाईट स्तर आहे, अशी टीका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ट्रम्प यांच्या प्रशस्त ‘पाम हाऊस’ आणि ‘मार-ए-लोगो’ येथे ‘एफ्.बी.आय.’ने धाड टाकली होती. या वेळी अधिकार्‍यांनी कागदपत्रे जप्त केली होती. यापूर्वी या धाडीविषयी बोलतांना ट्रम्प म्हणाले होते की, असे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमवेत यापूर्वी कधीही घडले नव्हते. अन्वेषण यंत्रणांना सहकार्य करूनही अशी कारवाई केली जात आहे. न्यायव्यवस्थेचा चुकीचा वापर होत आहे. हे कट्टर साम्यवादी लोकशाहीवाद्यांचे आक्रमण आहे. मी वर्ष २०२४ ची निवडणूक लढवावी, अशी त्यांची इच्छा नाही.