अमृतसर (पंजाब) येथे चारचाकी गाडीच्या खाली बाँब ठेवून घातपाताचा कट उघड

बोलेरो चारचाकी गाडीच्या खाली ठेवलेला बाँब

अमृतसर (पंजाब) – येथील ‘रंजीत एवेन्यू’ निवासी संकुलामध्ये पहाटे दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी एका बोलेरो चारचाकी गाडीच्या खाली बाँब लावल्याचे उघडकीस आले. पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणावरून माहिती मिळाल्यानंतर गाडीची तपासणी केल्यावर त्यांना गाडीच्या खाली लावलेला बाँब सापडला. पोलीस या दोघा तरुणांचा शोध घेत आहेत.