राष्ट्रध्वज वितरित केल्यावरून गरीब हिंदु कुटुंबाला ‘सर तन से जुदा’ची धमकी !

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील घटना

(‘सर तन से जुदा’ म्हणजे ‘शिर धडापासून वेगळे करणे)

बिजनौर (उत्तरप्रदेश) – भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथील अरुण कश्यप उपाख्य अन्नू यांच्या गरीब कुटुंबाने परिसरात राष्ट्रध्वज वितरित केले होते. यावरून या कुटुंबाला ‘तुमचा शिरच्छेद करू’, अशा धमकीचे पत्र मिळाले आहे. यामुळे पूर्ण कुटुंब भयाच्या सावटाखाली आहे. पोलिसांनी कुटुंबाला संरक्षण पुरवले आहे. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू करण्यात आले आहे.

अरुण कश्यप येथील बुद्धुपाडा क्षेत्रात एका छोट्याशा घरात त्याच्या कुटुंबासह रहातात. १४ ऑगस्टच्या सकाळी कश्यप यांना समजले की, त्यांच्या घराबाहेर भिंतीवर धमकीचे पत्र चिकटवण्यात आले आहे. त्यात लिहिले होते, ‘‘अन्नू, तुला घराघरांत तिरंगा पहायला पुष्कळ आनंद होत आहे. तुझे धडही शरिरापासून वेगळे करावे लागेल ! – आय.एस्.आय.चा सहकारी.’’ हे पत्र वाचून पोलिसांनाही धक्का बसला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीन रंजन सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्यात येत आहे. संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका

स्वातंत्र्यदिनाचा द्वेष करणारे कोण आहेत आणि ते अशी धमकी का देत आहेत ?, हे सर्वांना ठाऊक आहे ! अशांच्या मुसक्या आवळणे आवश्यक !