मध्यप्रदेशात हिंदु विद्यार्थ्याचा दोन भागांत कापलेला मृतदेह आढळला !

घटनेच्या काही मिनिटांपूर्वी वडिलांना ‘सर तन से जुदा’ (डोके धडापासून वेगळे) असा मिळाला होता संदेश !

उजवीकडे निशंक राठौर

भोपाळ – मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामध्ये २४ जुलैच्या सायंकाळी निशंक राठौर नावाच्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर दोन भागांत कापलेल्या स्थितीत आढळून आला. निशंकच्या कमरेपासून वरचा आणि खालचा असे दोन भाग झाले असल्याचे आढळून आले.

या घटनेच्या काही मिनिटांपूर्वीच निशंक याच्याच भ्रमणभाषवरून त्याच्या वडिलांच्या भ्रमणभाषवर ‘राठौर साहेब, तुमचा मुलगा पुष्कळ शूर होता. गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा (महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍याला ‘धडापासून शिर वेगळे करणे’, ही एकच शिक्षा !)’, असा संदेश आला होता. निशंकचे वडील उमाशंकर राठौर यांनी सांगितले की, निशंकच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ आणि ‘इन्स्टाग्राम’ खात्यांवरील छायाचित्रांवर (‘डीपीं’वर) ‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा ।’, हेच वाक्य लिहिले होते.

१. प्राथमिक तपासात पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे सांगितले असले, तरी वडिलांच्या भ्रमणभाषवर आलेल्या संदेशामुळे ‘ही आत्महत्या असू शकत नाही’, असे म्हटले जात आहे.

२. उमाशंकर राठौर म्हणाले की, निशंक आत्महत्या करूच शकत नाही. त्याची हत्या करण्यात आली आहे. तो हिंदुत्वनिष्ठ विचारसरणीचाही नव्हता.

३. २१ वर्षीय निशंक हा भोपाळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षात शिकत होता. तो मूळचा भोपाळ येथील नर्मदापूरच्या सिवनी-माळवा येथील रहिवासी होता.

४. भोपाळ आणि सिवनी माळवा यांमध्ये असलेल्या रायसेन जिल्ह्यातील बडखेडा रेल्वे स्थानकाजवळ त्याचा मृतदेह आढळला.

संपादकीय भूमिका 

‘सर तन से जुदा’ असा संदेश मिळण्यातून या घटनेमागे धर्मांध मुसलमान असल्याची शक्यता नाकारता येत नाही ! यातून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंचेच जीवन अधिकाधिक असुरक्षित होत असल्याचेच हे द्योतक !