दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांनी अर्पण केलेली शाल पांघरल्यावर काढलेल्या छायाचित्रांच्या संदर्भात विविध अनुभूती येण्यामागील अध्यात्मशास्त्र’ या विषयाचा कु. मधुरा भोसले यांचा लेख वाचतांना साधिकेने अनुभवलेली भावस्थिती !

सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांनी अर्पण केलेली शाल पांघरल्यानंतरची परात्पर गुरु डॉ. आठवले यांची दिव्य भावमुद्रा असलेले छायाचित्र

या छायाचित्राकडे कोणत्याही दिशेने पाहिले असता ‘परात्पर गुरु डॉक्टर आपल्याकडेच पहात आहेत’, तसेच ‘त्यांचे डोके आणि शरीरही आपल्याकडे वळलेले आहे’, असे जाणवते.


‘१३.२.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीमध्ये कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचा ‘सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अर्पण केलेली शाल पांघरल्यावर काढलेल्या छायाचित्रांसंदर्भात विविध अनुभूती येण्यामागील अध्यात्मशास्त्र’, हा लेख प्रसिद्ध झाला. या लेखाचे वाचन करतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सौ. कोमल जोशी

१. लेखाचा मथळा वाचल्यावर ध्यान लागणे

मी हा लेख वाचायला चालू केला. त्या वेळी केवळ मथळा वाचला आणि लगेचच ध्यान लागून माझे मन स्थिर झाले.

२. लेखातील अक्षरांमध्ये गुरुपादुका आणि संत यांचे दर्शन होणे

मला लेखातील सर्व अक्षरांमध्ये गुरुपादुकांचे दर्शन झाले. पूर्ण लेखातून मला विविध प्रकारच्या लहान लहान गुरुपादुका बाहेर येतांना दिसल्या आणि लेखात मला प.पू. श्रीअनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज, प.प. श्रीधरस्वामी अन् श्री गजानन महाराज या संतांचे दर्शन झाले.

३. गुरुपादुकांवर डोके ठेवून मानस नमस्कार केल्यावर माझी भावजागृती होऊन आपोआप माझा कृतज्ञताभाव जागृत झाला आणि गुरुभेटीचा आनंद घेत ध्यान लागले.

४. परात्पर गुरु डॉक्टरांचे हसरे मुखमंडल दिसून त्यातून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होतांना दिसणे

त्या वेळी माझा ‘निर्गुण’ हा नामजप श्वासोच्छ्वासाला जोडून होत होता. मध्येच मला परात्पर गुरु डॉक्टरांचे निखळ हसरे मुखमंडल दिसत होते. त्यातून निर्गुण चैतन्य प्रक्षेपित होऊन काही मिनिटे मला आनंदाची स्थिती अनुभवता आली.’

– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक