परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या संदर्भात कु. एकता नकाते हिला आलेली अनुभूती आणि सुचलेल्या काव्यपंक्ती !

अनुभूतींतून  सर्वांना आनंद देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. एकता नखाते

भावप्रयोग करतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी साधिका बसत असलेल्या आसंदीवरच प्रत्यक्षातही सत्संगाच्या वेळी बसल्याचे लक्षात येणे आणि तिला कृतज्ञता वाटणे : ‘एकदा मी सूक्ष्मातून ‘गुरुदेवांच्या सत्संगाला जात आहे’, असा भावप्रयोग करत असतांना ‘मी शेवटच्या रांगेत पहिल्या आसंदीत बसले आहे’, असे मला दिसले. त्यानंतर अनेकदा भावप्रयोग करतांना मी सूक्ष्मातून त्याच आसंदीत बसल्याचे मला दिसत असे. ज्या दिवशी गुरुदेवांचा सत्संग झाला, त्या दिवशी मला तीच आसंदी बसण्यासाठी मिळाली होती. तेव्हा ‘माझी सूक्ष्मातून झालेली भेट गुरुदेवांच्या चरणी पोचली आहे’, असे वाटून माझा कृतज्ञताभाव दाटून आला.’

 गुरुदेवजी, सच्चिदानंद की अनुभूति हो आप ।

प.पू. गुरुदेवांच्या सत्संगाच्या वेळी त्यांच्याकडे पहात असतांना मला पुढील ओळी सुचल्या.

गुरुदेवजी,
सच्चिदानंद की अनुभूति हो आप ।
प्रेम की पराकाष्ठा हो आप ।
साधकों के प्राणों में बसते हो आप ।
गुरुदेवजी, हमारा जीवन हो आप ।। १ ।।

– कु. एकता नखाते, सनातन आश्रम, रामनाथी गोवा. (२७.१२.२०२१)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.