‘वर्ष २००९ पासून कु. आरती सुतार ही दैनिकाशी संबंधित सेवा करत आहे. ती संगणकावर टंकलेखन आणि इतर सेवा करते. तिचा हात दुखतो, तरीही ती हाताला कापड बांधून आनंदाने सत्सेवा करते. हात दुखत आहे; म्हणून तिचा त्रागा झाल्याचे मला कधीच जाणवले नाही.
मी तिला मधून मधून ‘हात कसा आहे ?’, असे विचारतो. तेव्हा मला उत्तर देतांना ती ‘हात दुखत आहे’, असे सहजतेने सांगते. तिच्या घरी बर्याच अडचणी होत्या. अशा स्थितीतही ती रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवारत असायची. तिने कधीही सेवेत खंड पडू दिला नाही. ‘ईश्वरेच्छेने सत्सेवा केली, तर गुरुकृपा सहज प्राप्त होते आणि गुरु सत्-चित्-आनंद प्रदान करतात’, हे माझ्या लक्षात आले. तिला सातत्याने आध्यात्मिक प्रगतीचा ध्यास लागला आहे.’
– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी, (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६६ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)