‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ या ग्रंथाच्या संदर्भात श्रीमती स्मिता नवलकर यांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ (छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३ ) या ग्रंथाच्या संदर्भात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांना आलेल्या अनुभूती

१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ (छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ३) हा ग्रंथ वर्ष २०१९ च्या गुरुपौर्णिमेनंतर प्रकाशित झाल्यावर मला तो प्रसादरूपात भेट म्हणून मिळाला. मी काही दिवस तो ग्रंथ कपाटात ठेवला. मी नामजप करतांना तो ग्रंथ कपाटातून बाहेर काढून समोर ठेवायचे आणि मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे पाहून नामजप करायचे.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्थुलातील अलौकिक कार्य’ या पालट झालेल्या ग्रंथाचे छायाचित्र

२. ग्रंथ नियमितपणे उशाजवळ ठेवू लागल्यावर त्यातून पुष्कळ चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होणे आणि काही मासांनी त्या ग्रंथात पालट जाणवू लागणे : ऑक्टोबर २०२० पासून मी तो ग्रंथ नियमितपणे माझ्या उशाजवळ ठेवत आहे. त्यातून मला पुष्कळ चैतन्य मिळून मला आध्यात्मिक लाभ व्हायला लागले. वर्ष २०२१ पासून मला ग्रंथात पुढील पालट जाणवायला लागले.

श्रीमती स्मिता नवलकर

अ. वर्ष २०२१ च्या गुरुपौर्णिमेपासून ग्रंथातील निर्गुणतत्त्वात वाढ होऊन मला त्यात अधिक जिवंतपणा जाणवायला लागला.

आ. ‘छायाचित्रातील गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) माझ्याशी संवाद साधत आहेत’, असे मला जाणवते.

इ. मी बाहेरून खोलीत आल्यावर मला पुष्कळ चैतन्य जाणवते.

ई. सध्या खोलीत दैवी कण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे.’

– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.६.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक