कोलकाता – महमंद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी बंगाल विधानसभेत नूपुर शर्मा यांच्या विरोधात निषेध ठराव संमत करण्यात आला. (धर्मनिरपेक्ष भारतीय राज्यघटनेनुसार चालणार्या बंगालच्या विधानसभेला धार्मिक सूत्रावर ठराव संमत करण्याचा अधिकार आहे का ? – संपादक)
नूपुर शर्मा यांना अद्याप अटक कशी झाली नाही ? – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
नूपुर शर्मा यांच्या विरोधातील निषेध ठरावावरील चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘राज्यात हिंसाचार झाला तेव्हा आम्ही कारवाई केली; पण या महिलेला (नूपुर शर्मा) अद्याप अटक कशी झाली नाही ? तिला अटक होणार नाही, हे मला माहीत आहे.’
भाजपच्या आमदारांचा सभात्याग
नूपुर शर्मा यांच्या विरोधात विधानसभेत निषेध ठराव मांडल्यानंतर भाजपच्या आमदारांनी सभ्यात्याग केला.
संपादकीय भूमिका
|