जेरुसलेम येथे पॅलेस्टॉईनच्या इस्लामी विचारवंताचे मुसलमानांना चिथावणी
नवी देहली – महंमद पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी इस्रायलच्या जेरुसलेम येथील अल् अक्सा मशिदीजवळ १० जून या दिवशी आयोजित सभेत पॅलेस्टाइनचे इस्लामी विचारवंत निधाल सियाम यांनी गायींची पूजा करणार्या हिंदूंविरुद्ध जिहाद चालू करण्याचे आवाहन केले. ‘पाकिस्तानकडे हिंदूंना धडा शिकवण्यासाठी सक्षम सैन्य आहे’, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Nidhal Siam, a Palestinian scholar, spews hate from Al-Aqsa yet again, this time he wants jihad declared against Hindus to have them all killed.
In 2020, he warned Emmanuel Macron of Muslims conquering Europe. In 2017, he sought Allah’s help to slaughter Americans and Europeans. pic.twitter.com/z5xoxiCfdu
— Sonam Mahajan (@AsYouNotWish) June 12, 2022
निधाल सियाम म्हणाले की,
१. अक्सा मशिदीतून आम्ही मुसलमान सैन्याला संबोधित करत आहोत. इजिप्त, तुर्कीये, जॉर्डन यांसह सर्वच इस्लामी देशांना आम्ही विचारतो, ‘तुम्ही कुठे आहात ? तुमचा धर्म आणि पैगंबर यांना पाठिंबा देण्याची हीच खरी वेळ नाही का ? आपल्या देशांना स्वतंत्र करण्याची हीच योग्य वेळ नाही का ?
२. सर्वप्रथम अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान यांच्यावर आक्रमण केले. यानंतर स्विडनने मुसलमान मुलांचे अपहरण केले. फ्रान्सने आक्रमण केले. रशियाने अनेक वेळा आक्रमण केले. यानंतर चीननेही गुन्हा केला. आता गायींची पूजा करणार्या हिंदूंनी मशिदी उद्ध्वस्त केल्या. त्यांनी मुसलमानांची कत्तल केली आणि त्यांची गावे उद्ध्वस्त केली.
३. पाकिस्तानी नागरिकहो, तुम्हाला हिंदूंशी लढण्याचे मोठे दायित्व पार पाडायचे आहे. ते तुमच्या सीमेवर आहेत. त्यांनी तुमच्या भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. ते तुमच्या लोकांना मारत आहेत. आता हिंदूंचा सामना करण्यासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.
संपादकीय भूमिका
|