महापालिकेने केले रेस्टॉरंट सील !
कर्णावती (गुजरात) – येथील ‘सायंस सिटी रोड’वर असलेल्या ‘मॅकडोनाल्ड्स’च्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांच्या शीतपेयात मेलेली पाल आढळून आल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. संबंधित ग्राहकाने महापालिकेकडे या विरोधात तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या आरोग्य आणि अन्न विभागाने शीतपेयांचे नमुने घेऊन ते सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून रेस्टॉरंट सील केले आहे.
‘मॅकडोनाल्ड्स’च्या व्यवस्थापकाची संवेदनाहीनता !संबंधित ग्राहकाने सांगितले की, ‘मॅकडोनाल्ड्स’च्या व्यवस्थापकाला याविषयीची माहिती दिली असता तो हसू लागला. व्यवस्थापक म्हणाला की, असे बऱ्याचदा घडते. व्यवस्थापकाने पुढे सांगितले की, आम्ही केवळ तुम्हाला तुमचे पैसे परत करू शकतो. (‘मॅकडोनाल्ड्स’ च्या व्यवस्थापकाचे संतापजनक उत्तर ! जनतेच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा संवेदनाहीन व्यवस्थापकावर कठोर कारवाईच व्हायला हवी ! – संपादक) |