‘अनधिकृत भोंगे लावू शकत नाही, तसेच केवळ ६ ते १० या वेळात ७५ डेसिबलपेक्षा न्यून आवाजात भोंगे लावू शकतो’, असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही मौलवी उद्दामपणे अशी वक्तव्य करतात. अशा कायदाद्रोह्यांवर प्रथम कारवाई करा !
मालेगाव – ३ मे या दिवशी काय प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही. हे दंगे भडकवण्याचे षड्यंत्र आहे. इथे हुकूमशाही चालणार नाही. कायद्यानुसार राज्य चालते. हे (मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे) भाजपची भाषा करत आहेत.
कुणाच्या धर्मात हस्तक्षेप करू नका, अशी उद्दाम प्रतिक्रिया मालेगाव येथील मौलवींनी (इस्लामच्या धार्मिक नेत्यांनी) माध्यमांना दिली. १२ एप्रिल या दिवशी राज ठाकरे यांनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याची समयमर्यादा ठाणे येथील सभेत दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.