|
अकोला – महिलांना रोजगार मिळवून देण्याच्या नावाखाली सहस्रो महिलांची दीड कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या जिल्हा महासचिव संगीता चव्हाण यांच्यावर ८ एप्रिल या दिवशी गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.
१. पुणे येथील राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन प्रा. लिमिटेड आस्थापनाने येथे कार्यालय चालू केले होते. संगीता चव्हाण यांनी आस्थापनाच्या माध्यमातून बटन बनवण्याचे यंत्र आणि त्यासाठी लागणारा कच्चा माल यांसाठी अनेक महिलांकडून ११ सहस्र रुपये घेतले.
२. ‘एका महिलेने आणखी ३ महिला जोडल्यास त्यांना प्रति मास १२ सहस्र रुपये मिळतील’, असे सांगितले. त्यानुसार महिलांनी सहस्रो महिलांना समवेत जोडले. प्रारंभी कच्चा माल दिला. त्यानंतर माल देण्यास नकार दिला. त्यामुळे महिलांना कमाई करता आली नाही.
३. पहिली योजना बंद पडल्याने आस्थापनाने दुसरी योजना काढली. मसाला बनवण्यासाठी महिलांकडून १५ सहस्र रुपये घेतले. त्यासाठी कच्चा मालही दिला; परंतु प्रारंभी महिलांना आधीसारखीच महिलांची साखळी सिद्ध करण्यास सांगितली; पण ती योजनाही बंद पाडली. अनुमाने २-३ सहस्र महिलांची अशा प्रकारे आर्थिक फसवणूक करण्यात आली आणि त्यांना रोजगारही देण्यात आला नाही