‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. अपाला अमित औंधकर ही दैवी बालके आणि दैवी युवा साधक यांचा ‘दैवी सत्संग’ घेते. त्या सत्संगांना उपस्थित असणारी दैवी युवा साधिका कु. मधुरा गोखले हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रगल्भता
‘कु. अपाला १५ वर्षांची आहे; पण तिचे बोलणे ऐकतांना ‘कोणी ज्ञानी आणि अनुभवी व्यक्ती माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवते. तिचे वागणे-बोलणे आणि आश्रमात वावरणे यांतून तिची प्रगल्भता जाणवते.
२. दैवी साधकांवर चांगले संस्कार करणे
अपालाची निरीक्षणक्षमता उत्तम आहे. ती दैवी बालकांचा सत्संग घेते. ‘अन्य साधक काही सूत्रे सांगतांना त्यातील कोणती सूत्रे शिकण्यासारखी आहेत आणि प्रत्येकाने लिहून ठेवायला हवीत’, हे ती अचूक ओळखते आणि ती सर्वांना अशी सूत्रे लिहून घ्यायला सांगते. काही बालसाधक काही सूत्रे लिहून घेत नाहीत. तेव्हा ती वेळोवेळी कधी प्रेमाने, तर कधी कठोरतेने सर्वांना त्याची जाणीव करून देते. तिने आमच्या मनावर सत्संगातील सर्व सूत्रे लिहून घेण्याचा संस्कार केला आहे.
३. तत्त्वनिष्ठता
३ अ. बालसाधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देणे : तिला लक्षात आलेल्या दैवी बालकांच्या चुकांची तिने तत्त्वनिष्ठतेने जाणीव करून दिली, तरीही ‘त्यांच्यात पालट होत नाही’, हे लक्षात आल्यावर ती पुढच्या पुढच्या टप्प्याला जाऊन त्यांना जाणीव करून देत राहिली. तेव्हा तिने ‘ते दैवी बालक आहेत किंवा लहान आहेत’, असा विचार करून त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले नाही किंवा त्यांना पाठीशीही घातले नाही. तिने केलेल्या या कृतींमधून बालसाधक आणि त्यांचे पालक या सर्वांनाच पुष्कळ शिकायला मिळाले. तिने सर्वांसमोर ‘गुरूंनी दिलेले दायित्व योग्य प्रकारे निभावून त्यांचे मन कसे जिंकायचे ?’, याचा आदर्श ठेवला. या प्रसंगातून ‘गुरुदेवांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्र कसे असेल ? त्यातील शासन आणि न्यायव्यवस्था कशी असेल ?’, याची झलक मला अनुभवता आली.
३ आ. बालसाधकांमध्ये ध्येयाप्रतीचे गांभीर्य निर्माण करणे : सत्संगात प्रतिदिन एक ध्येय दिले जाते. बालसाधकांकडून ते विसरण्याचा किंवा पूर्ण न करण्याचा भाग व्हायचा. त्या वेळी तिने कठोर राहून त्यांना त्याची जाणीव करून दिली, तरीही बालसाधकांकडून पुन्हा त्या चुका झाल्यावर प्रायश्चित्त घ्यायला सांगून तिने सर्वांमध्ये ध्येयाप्रतीचे गांभीर्य निर्माण केले.
४. अंतर्मुख
ती सत्संगात सतत ‘माझे सांगण्यात काही चुकले का ?’, असे विचारते. तिला कुणी चूक सांगितल्यावर ती स्थिर राहून चूक स्वीकारते आणि त्यासाठी ती क्षमायाचनाही करते. तिच्या या कृतीतून ‘ती केवळ इतरांबद्दलच तत्त्वनिष्ठ आहे’, असे नाही, तर स्वतःच्या संदर्भातही ती तेवढीच कठोर आणि तत्त्वनिष्ठ आहे’, असे मला शिकायला मिळाले.
५. भाव
अपालामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. ती सत्संगात बोलतांना तिच्या अंतरातील भाव तिच्या तोंडवळ्यावर दिसतो. तिच्यातील भावामुळे प्रतिदिन सत्संगाला उपस्थित असणाऱ्या साधकांना ‘भाव निर्माण होणे, व्यष्टी साधनेचे गांभीर्य निर्माण होणे, मनातील प्रश्नांची उत्तरे प्रश्न विचारण्याआधीच मिळणे’, अशा अनेक अनुभूती येत आहेत.
६. जाणवलेले पालट
मी ३ वर्षांपासून अपालाला ओळखते. पूर्वी तिच्यात तिच्या वयाला साजेसा अवखळपणा आणि चंचलता होती. आता अपालामध्ये थक्क करणारा पालट झाला आहे. ती अत्यंत अंतर्मुख आणि स्थिर झाली आहे. ती केवळ १५ वर्षांची असूनही तिची अफाट बुद्धीमत्ता, प्रगल्भता आणि अध्यात्माविषयीचे ज्ञान पाहून तिच्या पायांवर लोटांगण घालण्याची माझी इच्छा होऊ लागली आहे. ‘तिच्याकडून आणखी शिकायला पाहिजे’, असे मला वाटू लागले.
७. कृतज्ञता
‘अशा असामान्य आणि दैवी बालिकेला मला जवळून अनुभवायला मिळते’, ही गुरुदेवांची माझ्यावर अनन्य कृपा आहे. तिला माझे सादर वंदन ! ‘अपालाचे गुण अनुभवण्याची मला संधी दिली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा गोखले (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२२)
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने दैवी बालकांचा सत्संग घेणाऱ्या दैवी बालिका कु. अपाला औंधकर आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
‘कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे) आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय १० वर्षे) दैवी बालके अन् दैवी युवा साधक यांचा सत्संग घेतात. ‘दैवी बालक कसे असतात ? गुरुदेवांना अपेक्षित हिंदु राष्ट्र ते कसे चालवणार ? त्यांचे दैवी गुण कसे असतात ?’, असे प्रश्न मला नेहमी पडायचे. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला दैवी बालकांच्या सहवासात रहाण्याची अमूल्य संधी लाभली. त्या दोघी सत्संग घेतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘हे गुरुदेवा, मला या दैवी बालकांकडून प्रत्येक क्षणी शिकता येऊ दे आणि शिकायला मिळालेले प्रत्येक सूत्र मला आचरणात आणता येऊ देत.’ या दैवी बालकांचा सहवास दिल्याबद्दल आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिल्याबद्दल अनेक दैवी लक्षणे अन् शुभ चिन्हे यांनी युक्त अशा महाविष्णुस्वरूप गुरुदेवांच्या पावन चरणी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा गोखले (वय २२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.२.२०२२)
|