अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्याचे आदेश

कोल्हापूर, ३० मार्च (वार्ता.) – १० वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर ३० मार्च या दिवशी होत आहे. हा पेपर जयसिंगपूरमध्ये सामाजिक माध्यमांद्वारे फुटल्याची अफवा पसरली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ‘‘हा पेपर फुटलेला नाही. सामाजिक माध्यमांवर जो पेपर फुटल्याचे सांगितले जाते त्याचा संकेतांक क्रमांक एन्-३९७ आहे, तर ३० मार्चचा मराठी माध्यमाच्या पेपरचा संकेतांक एन्-७४४ आणि इंग्रजी माध्यमाच्या पेपरचा संकेतांक एन्-७४५ आहे. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात येणार आहे.’’ अशी माहिती पत्रकारांना दिली.
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !
पुणे महापालिका समान आणि पुरेसे पाणीपुरवठा योजनेची ‘श्वेतपत्रिका’ काढणार का ?
आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर कार्यवाही करावी !