नवी देहली – युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी सामाजिक माध्यमांवरील व्हिडिओचा संदर्भ दिला. यात व्हिडिओमध्ये ‘युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतियांना परत आणण्यासाठी सरन्यायाधिशांनी काय केले ?’, असा प्रश्न लोकांनी त्यांना विचारला होता. यावर सरन्यायाधिशांनी, ‘‘मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवण्याचा आदेश द्यायला हवा का ?, असा प्रश्न विचारला आहे. युक्रेनच्या सीमेवर अडकलेल्या २०० हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना वाचवण्याच्या संदर्भात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
“Do you want us to pass orders to Putin to stop the war?,” asked CJI NV Ramana. (By @mewatisanjoo & @AneeshaMathur)#RussianUkrainianWar #Ukraine #Russia #UkraineRussiaWarhttps://t.co/cAjbsz55ox
— IndiaToday (@IndiaToday) March 3, 2022
सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, आम्हाला विद्यार्थ्यांविषयी पूर्ण सहानुभूती आहे. भारत सरकार त्यासाठी काम करत आहे. तरीही आम्ही ‘अॅटर्नी जनरल’ यांना ‘याविषयी काय करता येईल’, असे विचारू.