आज माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१ मार्च २०२२) या दिवशी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने…
‘१२.८.२०१९ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या महादेवाच्या चित्राकडे पाहून माझे मन शांत झाले. चित्रातील शिवाचे ध्यान पाहून ‘येथेच ध्यानाला बसावे’, असे मला वाटले आणि मी ध्यानाला बसले. त्या वेळी मला विभूतीचा सुगंध येऊ लागला. काही दिवसांपूर्वी प.पू. आबा उपाध्ये यांनी आम्हा साधकांना आशीर्वादरूपी विभूती लावली होती. ‘ती विभूती हीच आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी ‘आम्ही सर्व साधक परम भाग्यवान आहोत’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. मी लहान असतांना एका पुरातन शिवमंदिरात जात होते. ते मंदिर घरापासून पुष्कळ दूर होते; पण मला त्या मंदिरात जाण्याची ओढ असे. त्या वेळेपासून मला आपोआप ‘ॐ नमः शिवाय ।’ या नामजपाची गोडी लागली.’
– सौ. ज्योती कांबळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |