आगामी काळासाठी मालीश, बिंदुदाबन यांसारख्या उपचारपद्धती प्रत्येकानेच शिकणे आवश्यक !

परात्पर गुरु डॉक्टरांचे समाजासाठी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘आगामी आपत्काळात डॉक्टर, वैद्य आणि औषधे इत्यादि उपलब्ध होणे कठीण असणार. अशा वेळी रुग्णाला आराम मिळण्यासाठी बिंदुदाबन, मालीश यांसारख्याच उपचारपद्धती उपयोगी पडणार आहेत. या परिस्थितीला कोणालाही सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आता कितीही अन्य व्यावहारिक ज्ञान उदा. संगणक असले, तरी त्या वेळी स्वतःच्या कुटुंबियांवर उपचार करण्यासाठी प्रत्येकानेच हे आता शिकून घेणे आवश्यक आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१.२०२२)