श्री गणेश जयंतीचा इतिहास आणि महत्त्व

४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी ‘श्री गणेश जयंती’ आहे. त्यानिमित्ताने…

इतिहास

श्री गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुक्ल पक्ष चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटींनी अधिक कार्यरत असते.

महत्त्व

गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने अधिक प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटींनी कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति (भाग १)’)