मूर्तीकला आणि चित्रकला यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद !

‘मूर्तीकलेमुळे देवतेचे रूप मूर्तीमध्ये साकार होते. देवळामध्ये देवतेच्या मूर्तीची स्थापना करून तिचे नित्य पूजन केले जाते. त्यामुळे ती मूर्ती जागृत होते आणि देवतेच्या मूर्तीचे दर्शन घेणार्‍यांचा देवतेच्या मूर्तीप्रती असणारा भाव जागृत होतो. त्याचप्रमाणे अनेक कलाकार देवतेचे चित्रही काढतात. देवतेची मूर्ती निर्माण करणारा मूर्तीकार आणि देवतेचे चित्र काढणारा चित्रकार जर सात्त्विक असतील, तर त्यांच्याकडून देवतेची सात्त्विक मूर्ती आणि चित्र यांची निर्मिती होते. त्याचा पूजा करणार्‍यांना आध्यात्मिक लाभ होतो. देवतेची मूर्ती आणि त्याचे चित्र यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यातील भेद पुढीलप्रमाणे आहेत.

कु. मधुरा भोसले

१. मूर्तीकला आणि चित्रकला यांतील भेद

२. देवतेच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

पृथ्वीवरील जीवन त्रिमितीय असल्यामुळे सर्व मनुष्यांत त्रिमिती मूर्तीविषयी जलद आपुलकी निर्माण होते आणि त्यांची मूर्तीशी जलद एकरूपता होऊ शकते. त्यामुळे मूर्ती हाताळतांना मनुष्य अधिक संवेदनशील रहातो. तसेच मूर्ती पहातांना लवकर भाव जागृत होतो. त्या मूर्तीला हाताने स्पर्श केल्यावर लवकर सजीवपणा जाणवतो. मूर्तीला अलंकृत करण्यात, वस्त्र नेसवण्यात वेगळाच वात्सल्यभावाचा आनंद जाणवतो. बाळकृष्णाच्या मूर्तीला सजवण्यात कित्येक भाविकांना आनंद मिळतो. मूर्ती मातीची किंवा काचेची असेल, तर ती जपून हाताळावी लागते. चुकून जरी ती भंगली, तर कायमची हानी होते.

३. देवतेच्या चित्राचे वैशिष्ट्य

चित्र जागृत करण्यात पुष्कळ भाव ठेवावा लागतो, तरच ते चित्र जागृत होते. चित्र द्विमितीय असल्यामुळे ते हाताळतांना तेवढी सतर्कता रहात नाही. चित्र जतन करायला त्याला चौकट (फ्रेम) करण्याची आवश्यकता असते. मूर्तीपेक्षा चित्र सहजतेने आपल्याजवळ ठेवता येते. उदा. चित्र खिशात ठेवता येते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.