पावसाचा अंदाज आणि परंपरागत आडाखा प्रयोगाद्वारे सिद्ध करणारे प्रा. कानानी !

बहाव्याच्या फुल

१. ‘पावसाळ्यात बहाव्याच्या फुलांवरून (बहावा एक वनस्पती) पावसाचा अंदाज बांधता येतो. पळसाला लवकर बहर आला, तर पावसाळा लवकर चालू होतो. पूर्ण बहर आल्यानंतर फुले गळण्याचे प्रमाण पुष्कळ वाढते. सर्व झाडांना एकदमच बहर येतो, असे नाही. अशा वेळी बहराच्या दिनांकाची सरासरी काढण्यात येते.

२. शेतकर्‍यांचा असा आडाखा आहे की, बहाव्याला पूर्ण बहर ज्या दिवशी येतो, त्या दिवसांपासून ४५ दिवसांनंतर पावसाळ्याला आरंभ होतो. केरळ, गुजरात आदी राज्यांत बहाव्याला येणार्‍या फुलांच्या बहरावर पावसाचा अंदाज घेण्यात येत आहे.

३. जुनागड येथील प्रा. पी.आर. कानानी यांनी कर्णावती येथे ‘गुजरात कृषी विद्यापिठा’त ‘बहाव्याला येणार्‍या फुलांचा बहर आणि पावसाळा चालू होण्याचा काळ’, याचा ६ वर्षे अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. हे निष्कर्ष परंपरागत आडाख्याची पुष्टीच करतात.’

(‘दैनिक गोमंतक’, ९.४.२००२)

(प्रा. कानानी यांनी मांडलेला आडाखा हवामान खात्याला चपराकच ! – संपादक)